करंजेत राष्ट्रवादीचा जनसंवाद दौरा संपन्न.
सोमेश्वरनगर - विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेवरून बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निंबुत वाघळवाडी गटात असणाऱ्या करंजगाव येथील मारूती मंदिरात राष्ट्रवादीच्या गाव संपर्क दौरा शनिवार दि ६ रोजी दुपारी पार पडला . गावागावांत समस्यांचा आढावा घेत निराकारण केले जात आहे. यावेळी निधी देण्यासाठी पूर्तता केली जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची संख्या वाढली आहे. तसेच कार्यक्रम दरम्यान माजी उपसरपंच बुवासाहेब हुंबरे यांनी सोमेश्वर हायस्कूल शिक्षण व इमारत दर्जाविषय बोलले तर त्याला पूर्णत्वाला नेऊ असे उपस्थित संचालकांनी सांगितले तसेच सोमेश्वर मंदिर येथे सध्या श्रावण महिना चालू असल्याकारणाने पार्किंगची प्रशस्त व्यवस्था असावी असाही मुद्दा यावेळेस उपस्थित मान्यवरांना सांगितला त्यावर नक्कीच तोडगा काढू असेही याप्रसंगी सांगण्यात आले.
गाव संपर्क दौऱ्याला इच्छुकांचीही गर्दी झाली होती. यावेळी सोमेश्वर पंचक्रोशीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. अजित पवार,सुप्रिया सुळे यांच्या खासदार निधीतून गावागावात झालेल्या विकासकामांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. गावातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी जो कोणी उमेदवार देईल, त्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष धनवान वदक,जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे ,कारखाना संचालक लक्ष्मीण गोफणे, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड,करंजेपुल सरपंच वैभव गायकवाड,
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड, सोमेश्वर कारखाना माजी कार्यकारि संचालक बाळासाहेब गायकवाड ,करंजे उपसरपंच बाळासाहेब शिंदे, करंजे राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष हुंबरे ,माजी उपसरपंच बुवासाहेब हुबरे, माजी उपसरपंच रविंद्र गायकवाड,मा तंटामुक्ती अध्यक्ष संताजी गायकवाड,पोलीस पाटील राजेश सोनवणे ,कोतवाल तानाजी जाधव संजय कुंभार,सचिन पाटोळे, निलेश गायकवाड,भाऊसो हुंबरे, मुर्लीधर गायकवाड, भाऊसो मोकाशी तसेच ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.
या संपर्क कार्यक्रम दौऱ्या प्रसंगी प्रास्ताविक व मनोगत माजी ग्रामपंचायत उपसरपंच बुवासाहेब हुंबरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार उपसरपंच बाळासाहेब शिंदे यांनी मानले.