Type Here to Get Search Results !

बारामती ! महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला

बारामती ! महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, बारामती येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला

बारामती - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल (ता बारामती ) येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला
      स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेची सजावट करण्यात आली. प्रमुख पाहुणे *माजी सुभेदार मा. श्री. बापू विठ्ठल भापकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले*. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. झेंडा गीताच्या गायनानंतर शाळेतील शिक्षिकांनी 'जयोस्तुते' हे गीत गायले.           
          अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शिक्षक व विद्यार्थ्यांद्वारे लिखित *७५ अनामिक स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्तपुस्तिकेचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.* अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आपल्या प्रशालेतील *पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थी तिरंगी पेहराव करून उपस्थित होते.* 
          इयत्ता ८वी,९वी च्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांच्या परवानगीने परेड सादर केली. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी *अनामिक स्वातंत्र्य वीरांची वेशभूषा* करून कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली. तसेच कवायत, लेझीम, डंबेल्स, पॉम-पॉम,स्केटींग इत्यादींची अतिशय विलोभनीय प्रात्यक्षिके सादर केली. 
          शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून देशसेवेसाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
        कार्यक्रमाला उपस्थित *प्रमुख पाहुणे माजी सुभेदार मा.श्री. बापू विठ्ठल भापकर* यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आपले मत व्यक्त करत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहुती दिलेल्या स्वातंत्र्य वीरांचे स्मरण केले. त्यानंतर सीमेवर असताना शत्रूला दिलेल्या झुंजीचे अतिशय चित्तथरारक व ह्दयस्पर्शी अशा प्रसंगांचे कथन करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. तसेच शिस्त, अभ्यास व संस्कार यांचे महत्त्व पटवून दिले.
       कार्यक्रमाच्या शेवटी १५ ऑगस्ट रोजी वाढदिवस असलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सर्वांना खाऊचे वाटप करण्यात आले. 
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्राची नाईक यांनी केले. शाळेची सजावट व इतर सर्व कामे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहात  पार पाडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test