मोरगाव ! ऋषिकेश दुध उत्पादन संस्थेकडून तीन गावातील शेतकऱ्यांना ध्वज वाटप
सोमेश्वरनगर - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि १३ ते १५ ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा फडकविला जाणार आहे. यानिमित्ताने बारामती तालुक्यातील मोरगाव येथील ऋषिकेश दुध उत्पादन संस्थेकडून तीन गावातील शेतकऱ्यांना ध्वज वाटप करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाची जनजागृती सुरु आहे . ग्रामपंचायती , सहकारी संस्थांनी जनजागृती करीत प्रत्येक घरावर तिरंगा फडकेल अशी तयारी केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरावर झेंडा फडकेल यासाठी मोरगाव येथील दुध उत्पादक संस्था पुढे आली आहे. येथील ऋषिकेश दूध उत्पादक संस्थेने मोरगाव, तरडोली, मासाळवाडी या तीन गावांतील शेतकऱ्यांना संस्थेचे अध्यक्ष निलेश गारडे यांनी ध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले .यावेळी संस्थेचे संस्थापक पांडुरंग गारडे, पंचायत समीती माजी सभापती अमृता गारडे,तरडोलीचे माजी सरपंच रामचंद्र भोसले , फुलचंद पवार, रामचंद्र शेरे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करुन ध्वजारोहणाचे नियम समजावून सांगितले. तसेच ध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ध्वज हवा असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले.