बारामती ! सवलतीच्या दराने अन्नधान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी "अनुदानातून बाहेर पडा" योजना
बारामती दि. १९: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांपैकी सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याची आवश्यकता नसणाऱ्यांसाठी तो लाभ नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला असून यासाठी "अनुदानातून बाहेर पडा" ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
सरकारी, निमसरकारी नोकरी, निवृत्तीवेतनधारक, व्यवसायिक, बागायतदार व शेती या उत्पादनाच्या स्रोताद्वारे ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी ४४ हजार व शहरासाठी ५१ हजार पेक्षा जास्त आहे असे लाभार्थी, चारचाकी वाहनधारक, आयकर भरणारे, ज्या कुटुंबातील व्यक्ती परदेशात आहे व स्वच्छेने धान्य सोडणार असतील अशा लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील फॉर्म भरुन संबधित तलाठी किंवा स्वस्त धान्य दुकानदार यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन, तहसिलदार विजय पाटील यांनी केले आहे.