पिंपळी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने महिला मेळावा, बचत गट कार्यक्रम संपन्न
बारामती : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने पिंपळी-लिमटेक गावातील महिला व बचत गटातील महिलांसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला मेळाव्यास मार्गदर्शन हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळीच्या वतीने मोफत राष्ट्रध्वज झेंडे वाटप करण्यात येणार आहेत. अशी माहिती देत असताना महिलांच्या अडीअडचणी व समस्या ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी जाणून घेतल्या तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिर व व्यावसायिक शिबिराचे आयोजन करून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येईल तसेच काही महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीने व सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून मोफत टेलरिंग प्रशिक्षणचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून शंभर पेक्षा जास्त महिलांनी प्रशिक्षण घेतले होते व काही महिलांनी स्वतःचा व्यवसाय देखील सुरु केला आहे तसेच आणखी वेगवेगळे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतील असे आश्वासन सरपंच मंगल केसकर यांनी दिले व १५ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच बचत गटातील महिलांसाठी बँके मार्फत व्यवसायासाठी कर्ज योजना राबविण्यात येईल. ग्रामसंघास ग्रामपंचायतीच्या वतीने आवश्यक ती मदत पुरविण्यात येईल व टेलरिंग प्रशिक्षण प्रमाणेच महिलांच्या मागणीनुसार ब्युटीपार्लर हा प्रशिक्षण उपक्रम घेता येईल. हर घर तिरंगा अभियानात १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज झेंडा फडकवण्यात यावा. त्याची विटंबना व अनादर होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. झेंडा फडकवत असताना राष्ट्रीय झेंड्याविषयी असलेल्या शासकीय नियमांचे पालन करण्यात यावे अशी माहिती ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी दिली.
तसेच ग्रामपंचायत सदस्या अश्विनी बनसोडे यांनी संचालक संतोषराव ढवाण-पाटील व बचत गटाच्या मार्फत महिलांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांना गरजेनुसार औषधे देण्यात येतील व पंचायत समिती बचत गट समूह विभागामार्फत महिलांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
श्रीमती हौसाबाई घोरपडे विद्यालय पिंपळीच्या वतीने प्रभात फेरी काढून
हातामध्ये तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन तसेच विविध घोष वाक्य लिहिलेले बोर्ड हाताममध्ये घेऊन ढोल ताशांच्या गजरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियान उपक्रमाची जनजागृती केली. यामध्ये पाचवी ते दहावीच्या विध्यार्थी व विध्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. प्रभातफेरी रॅली चे स्वागत ग्रामपंचायतीने केले तसेच काही मार्गदर्शक सूचना ग्रामविकास अधिकारी यांनी केल्या.
तत्पूर्वी ज्येष्ठांसाठीचा दिनविशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक आणि महिलांचा गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांचेशी हितगुज साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.स्वातंत्र्य काळापासून चालू घडामोडी चर्चा-संवाद करण्यात आला. त्यांचे सूचनेनुसार ग्रामपंचायतीकडून त्यांना सोयी सुविधा पुरविण्यात येतील असे आश्वासन संचालक संतोषराव ढवाण यांनी दिले.
यावेळी सरपंच मंगल केसकर, उपसरपंच आबासाहेब देवकाते, बारामती संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सुनिल बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य अजित थोरात, सदस्या अश्विनी बनसोडे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, अनिल बनकर, बाळासो बनसोडे, ग्रामस्थ हरिभाऊ केसकर,रवी धोत्रे, तसेच महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्वाती ठेंगल,दिपाली राजगुरू,वैशाली गायकवाड, मनिषा गायकवाड,स्नेहा थोरात,महिला सदस्या प्रसन्ना थोरात,जयश्री शिंदे,पूनम थोरात,सारिका तांबे
अंगणवाडी सेविका सोनम केसकर, रेशमा रुपनवर व आशा सेविका रेखा तांबे आदींसह ग्रामस्थ महिला कौशल्या थोरात, बेगम इनामदार, सुरेखा देवकाते, अंजना खोमणे व गटातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
आभार उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील यांनी मानले.