दाैंड- आलेगाव ग्रामपंचायतीच्या ऐतिहासिक निर्णयामुळे माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नीं, तसेच शहीद जवानांच्या कुटूंबीयांच्या हस्ते ध्वजाराेहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
आलेगावच्या सरपंच तृप्ती काळे व त्यांच्या सहकारी सदस्यांनी विचारविनिमय करुन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवी वर्षाच्या निमित्ताने आलेगावातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली.आलेगाव ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण- मच्छिंद्र कदम,बाळासाहेब जराड,गाेपीनाथ जराड,आलेगाव येथील ध्वजारोहण- बाळासाहेब कदम,राजाराम भाेसले,बाळासाहेब भाेसले. कदमवस्ती येथील ध्वजारोहण- श्रीमती लताबाई कदम,अरुण कदम,कल्याण कदम,गाेपीनाथ कदम,तुकाराम कदम,पंढरीनाथ कदम.काळेवस्ती येथील ध्वजारोहण- श्रीमती संगीता काळे,हिराबाई भाेसले,तुषार कदम.तर धुमाळवस्ती येथील ध्वजारोहण- आलेगावचे सुपूत्र विठ्ठल भैरु कुतवळ यांचे १९६२ च्या युद्धात शत्रूशी झुंज देत असताना त्यांना वीर मरण आले हाेते.अशा शहीद जवानांचे नातू संभाजी कुतवळ यांच्या हस्ते करण्यात आले.
आलेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आलेगावातील २२ माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींचा व त्यांच्या कुटूंबीयांचा सन्मान चिन्ह,शाल,श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी
सैनिकांच्या वतीने शाळेला स्पिकर संच सप्रेम भेट देण्याचे जाहिर केले.यावेळी दाैंड तालुका पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने जेष्ठ नागरिकांना ३५ जांभूळ वृक्षांच्या राेपांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरपंच तृप्ती काळे,उपसरपंच मानशी चितारे,अनिता धुमाळ,हंबीर धुमाळ,प्रणाली चितारे, इंगवले, अमाेल काळे, नवनाथ कदम, राहुल काळे, वसंत धुमाळ, शिवाजी काळे, लालासाहेब कदम, अशाेक कदम, याेगेश बाेबडे, निता कदम, भाऊसाहेब कदम, सचिन कदम,प्रशांत कदम, रामभाऊ कदम, नंदन जरांडे, पाेपट कुंभार ,प्रसाद दरेकर,ग्रामपंचायतीच्या सदस्या अनिता कदम
व माेठ्या संख्येने ग्रामस्थ, पालक, शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित हाेते.