स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त 'स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश' मोफत वाचनासाठी उपलब्ध
पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 'स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश, पश्चिम विभाग (खंड ३)' विनामूल्य वाचनासाठी नागरिकांना उपलब्ध करून दिला आहे. हा ग्रंथ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे १६६/१, सरदार बिल्डींग, गुरुद्वारासमोर, रविवार पेठ, पुणे ४११००२ येथे जनतेला वाचनासाठी विनामुल्य उपलब्ध आहे. याचा लाभ सर्व नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रे. श्री. गोखले यांनी केले आहे.