सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे संपन्न.
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु. सा.काकडे महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुक्रवार दिनांक १२ रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये ८८ मुले व १६ मुली अशा एकूण १०४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ लांडे यांचे शुभहस्ते झाले.
याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना ' हर घर तिरंगा अभियानाची' माहिती सांगून देशभक्ती मनामनामध्ये रुजवण्याचे व ध्वज संहितेचे पालन करण्याचे आवहान केले व विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे सदस्य व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे -देशमुख, सोमनाथ लांडे , भारत खोमणे व पत्रकार संतोष शेंडकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे असे सांगितले. याप्रसंगी संस्थेचे सह-सचिव सतीश लकडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
झालेल्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे प्रथम क्रमांक-
जाधव गणेश विकास, द्वितीय क्रमांक-दनाने निखिल छगन, तृतीय क्रमांक-बामणे विशाल गणेश.
तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक - होळकर वैष्णवी नानासो, द्वितीय क्रमांक-तोरवे वनिता धुळा,
तृतीय क्रमांक - बामणे मोनाली ताराचंद.
ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी स्पर्धा संयोजक प्रा.डॉ. बाळासाहेब मरगजे, प्रा.डॉ. श्रीकांत घाडगे, प्रा.दत्तराज जगताप, प्रा.अच्युत शिंदे, श्री. चेतन कोळपे यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. प्रवीण ताटे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. संजू जाधव, रवींद्र जगताप हे उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले .कार्यक्रमांचे आभार प्रा.दत्तराज जगताप यांनी केले.