चौधरवाडी येथे राष्ट्रवादीचा गाव संपर्क दौरा संपन्न
सोमेश्वरनगर - चौधरवाडी येथे राष्ट्रवादीचा गाव संपर्क दौरा शनिवार दि ६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे,कारखाना संचालक ऋषिकेश गायकवाड, लक्ष्मण गोफणे, धनवान वदक(अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती, बारामती तालुका).राज्य परिवहन महामंडळ पुणे विभाग प्रमुख रमाकांत गायकवाड, माजी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड,करंजेपुल सरपंच वैभव गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते भवानी माता मंदिर परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
पक्षाकडून गावाला भरभरून विकास निधी मिळाल्याचे सर्वांनी एकमताने मान्य केले. सार्वजनिक कार्यक्रमासाठी बहुउद्देशी इमारत, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये तरुणांना नोकरी, पंचायत समिती जिल्हा परिषद यामध्ये प्रतिनिधित्व असे संवाद करत कार्यक्रम सूत्रसंचालक युवा कार्यकर्ते शशांक पवार तर प्रास्ताविक माजी उपसरपंच तानाजी भापकर यांनी केले तसेच चौधरवाडी ग्रामस्थ युवा कार्यकर्ते सुखदेव शिंदे, सुरेश पवार, महेंद्र पवार सर्वांच्या वतीने पक्षाच्या मागे विश्वासाने उभे राहण्याचे आश्वासन दिले.यावेळी गाव पोलीस पाटील राजकुमार शिंदे, चारुहास शिंदे, संदीप चौधरी, दीपक भाऊ पवार सरपंच, सदस्य सह उपसरपंच पांडुरंग दगडे , चौधरवाडी सर्व तरुण मंडळ उपस्थित होते.