....त्या घटनेच्या विरोधात ..संघटना आक्रमक
आरोपींच्या तत्काळ मुसक्या आवळा अन्यथा बाजारपेठ बेमुदत बंदच ईशारा
महागाव:- व्यापाऱ्यावर झालेल्या,, हल्ला चढवुन लाखो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आरोपींना तत्काळ जेरबंद करा अन्यथा बाजारपेठ बंद ठेवण्याचा ईशारा महागाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
महागाव येथील असणंऱ्या व्यापारी अनिल शर्मा हे वसुली करून परत येत असतांना खडका उड्डाणपुलावर अज्ञात लुटारूंनी त्यांना अडवुन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवुन १०लाख रुपयांची बॅग लंपास केली असुन य व्यापारी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे. व्यापारी दहशतीमध्ये आहेत.महागाव तालुक्यातील चोरी,लुटमारीचे प्रमाण वाढते असुन तपास मात्र शुन्य असल्याने चोरट्यांचे मनोबल वाढत आहेत. आहे.चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने असुरक्षित वातावरणामुळे व्यापाऱ्यांचे कुटुंब चिंतेत जीवन जगत असल्याने अनेक व्यापारी आपले व्यापार बंद करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आरोपींना तत्काळ जेरबंद करावे,महागाव पोलीस स्टेशनला जादा पोलीस कर्मचारी देण्यात यावेत,महागाव शहरातगेल्या वर्षभरापासुन बंद असलेली दररोज रात्रीची गस्त पुन्हा चालु करावी अशा आशयाचे निवेदन महागाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले असुन या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २१ऑगस्टपासून स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा ईशारा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे,सुरेश शर्मा,दिपक पाटील राऊत, महेश चक्रवार संजय चिंतामणी,आरिफ सुरैय्या,विजय सुर्यवंशी,अविनाश नरवाडे, दिपक आडे,सुदाम खंदारे,अशोक तुमवार, अनिल नरवाडे शैलेश कोपरकर शिवराज ठाकरे सुधीर नरवाडे असलम सूरया जेयंत चौधरी नामदेवराव नरवाडे अंबिका जयस्वाल सुजितसिंह ठाकुर, विशाल पांडे ,मनोज व्यवहारे ,गणेश हिंगडे यांच्यासह व्यापारी बांधवांनी दिला आहे.