रोटरी क्लबऑफ बारामतीचे काम अत्यंत कौतुकास्पद - धनंजयभाऊ जामदार
बारामती : बारामती येथील रोटरी क्लब ऑफ बारामती समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी करीत असलेले काम अत्यंत मोलाचे आणि कौतुकास्पद असून रोटरी कडून असेच काम यापुढील काळातही होत राहो यासाठी माझ्या कायम शुभेच्छा रोटरी क्लब बारामती सोबत असतील असे प्रतिपादन बारामती येथील प्रसिद्ध उद्योजक आणि बारामती एमआयडीसी संघटनेचे अध्यक्ष एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष धनंजय भाऊ जामदार यांनी केले.
रोटरी क्लब बारामती यांचेकडून पारधी समाज जनजागृती सेवाभावी संस्था वाळुंज, तालुका आष्टी, जिल्हा बीड यांच्या आदिवासी समीकरण प्रकल्पातील विद्यार्थ्यांसाठी एक महिन्याच्या किराणा प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.याप्रसंगी रोटरी क्लब बारामतीचे अध्यक्ष रो. प्रा.डॉ.अजय दरेकर, उपाध्यक्ष रो. प्रा. डॉ. हनमंतराव पाटील, सचिव रो.अरविंद गरगटे, खजिनदार रो.रविकिरण खारतोडे रो. अलीअसगर बारामतीवाला, रो. कौशलशेठ शहा सराफ, रो. डॉ. सचिन मदने, रो. अतुल गांधी, बारामती सहकारी बँकेचे संचालक रो. किशोरशेठ मेहता, रो. अब्बास नाशिक वाला अभिजीत शिंदे आणि आदिवासी समीकरण प्रकल्पाचे प्रकल्प संचालक सुधीर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
धनंजयभाऊ जामदार पुढे म्हणाले की, आज समाजात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या समोर अनेक अडचणी उभ्या ठाकलेल्या आहेत त्यातही आदिवासी, भटक्या विमुक्त जाती जमातीतील, दलित समाजातील, तळागाळातील आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षण कसे घ्यायचे हा यक्ष प्रश्न उभा राहतो. या प्रश्नाचे उत्तर शोधत असताना रोटरी क्लब बारामती सारख्या संस्था या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून येतात त्यांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सहकार्य करतात आणि या विद्यार्थ्यांना उभं करण्याचा प्रयत्न करतात. रोटरीचे हे जगभर चाललेले प्रयत्न निश्चितपणे कौतुकास्पद आहेत,त्यातही बारामती येथील रोटरी क्लबचे काम अत्यंत कौतुकास्पद असून एक बारामतीकर म्हणून मला या कामाचा सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन धनंजय भाऊ जामदार यांनी केले. रोटरी क्लब बारामतीच्या या कामासाठी खारीचा वाटा म्हणून रुपये पाच हजाराचा धनादेश देऊन मी माझा सहभाग नोंदवत असून यापुढील काळातही रोटरीच्या प्रत्येक उपक्रमामध्ये मी अधिक हिरिरीने सहभागी होईल असे आश्वासन यावेळी धनंजय भाऊ जामदार यांनी दिले.
आदिवासी समीकरण प्रकल्पाचे संचालक सुधीर भोसले हे आदिवासी भटक्या विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी करीत असलेले काम निश्चितपणे उल्लेखनीय आहे, अशा कामासाठी मदत करायला रोटरी क्लब बारामती कायम तत्पर असेल असे आश्वासन रोटरी क्लब बारामतीचे अध्यक्ष प्रा. डॉ.अजय दरेकर यांनी दिले. धनंजयभाऊ जामदारांसारख्या दानशूर व्यक्ती जर रोटरीच्या पाठीमागे खंबीर उभे राहिल्या तर रोटरी समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले भरीव योगदान देऊन आपल्या कामाचा ठसा उमटविल्याशिवाय राहणार नाही असा आशावादही प्रा.डॉ. दरेकर यांनी व्यक्त केला रोटरी क्लब बारामती आणि धनंजय भाऊ जामदार यांनी पारधी समाज जनजागृती सेवाभावी संस्थेच्या आदिवासी समीकरण प्रकल्पासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आणि मदतीबद्दल आदिवासी समीकरण प्रकल्पाचे संचालक सुधीर भोसले यांनी ऋण व्यक्त केले. त्याचबरोबर आदिवासी समीकरण प्रकल्पास भेट देण्याचे निमंत्रण रोटरी क्लब ऑफ बारामती आणि धनंजयभाऊ जामदार यांना दिले. तसेच भविष्यातही आपणाकडून या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशाच प्रकारची मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ बारामतीचे उपाध्यक्ष हनुमंतराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन रोटरी क्लब बारामतीचे खजिनदार रविकिरण खारतोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रोटरी क्लब बारामतीचे सचिव अरविंद गरगटे यांनी मानले.
फोटो ओळी:
1. पारधी समाज जनजागृती सेवाभावी संस्था, वाळुंज,तालुका आष्टी, जिल्हा बीड यांच्या आदिवासी समीकरण प्रकल्पासाठी किराणा प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बारामती येथील प्रसिद्ध उद्योजक धनंजयभाऊ जामदार,बारामती रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा. डॉ. अजय दरेकर,उपाध्यक्ष प्रा. डॉ. हनमंतराव पाटील, सचिव अरविंद गरगटे, खजिनदार रविकिरण खारतोडे,बारामती सहकारी बँकेचे संचालक किशोरशेठ मेहता, सराफ होंडाचे संचालक कौशलसेठ सराफ, एचपी गॅस एजन्सीचे संचालक अलीअसगर बारामतीवाला, अब्बास नाशिकवाला,अभिजीत शिंदे आणि आदिवासी समीकरण प्रकल्पाचे संचालक सुधीर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
2. रोटरी क्लब ऑफ बारामती यांनी पारधी समाज जनजागृती सेवाभावी संस्था, वाळुंज, तालुका आष्टी,जिल्हा बीड यांच्या आदिवासी समीकरण प्रकल्पासाठी एक महिन्याचा किराणा प्रधान करण्यात आला. याप्रसंगी बारामतीतील प्रसिद्ध उद्योजक धनंजयभाऊ जामदार यांनी रोटरी क्लबच्या या उपक्रमासाठी रुपये पाच हजाराचा धनादेश प्रधान केला. याप्रसंगी धनंजयभाऊ जामदार यांचे सोबत रोटरी क्लब बारामतीचे अध्यक्ष प्रा.डॉ. अजय दरेकर, उपाध्यक्ष प्रा. डॉ. हनुमंतराव पाटील, सचिव अरविंद गरगटे, खजिनदार रविकिरण खारतोडे, कौशलसेठ शहा सराफ, किशोर सेठ मेहता, अभिजीत शिंदे, अलीअसगर बारामतीवाला, अब्बास नाशिकवाला, अतुल गांधी आणि आदिवासी समीकरण प्रकल्पाचे प्रकल्प संचालक सुधीर भोसले.