सोमेश्वरनगर ! अमृत महोत्सवीदिनानिमित्त आजी-माजी सैनिक संघटना सोमेश्वर येथे 'वीरनारी' हस्ते ध्वजारोहण.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील आजी माजी सैनिक संघटना मुख्य शाखा सोमेश्वर येथे माळेगाव येथील 'वीरनारी' शीतल बिंटू सुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला .
'राष्ट्रगीत' म्हणत सलामी देत.... 'भारत माता ..की जय'... 'वंदे मातरम .... घोषणा सर्व सैनिकांनी दिल्या
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोमेश्वर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप, माजी व्हाईस चेअरमन व संचालक शैलेश रासकर ,वडगाव पोलीस सहाय्यक निरक्षक सोमनाथ लांडे उपस्थित होते 75 वा अमृत महोत्सव निमित्त आजी-माजी सैनिक संघटना कार्यालय येथे दर वर्षी प्रमाणे विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तसेच वीरनारी,खेळाडूं ,पत्रकार मान्यवर सत्कार घेण्यात आला, तसेच कार्यक्रम प्रसंगी कृतिका किरण सोरटे हिने देश गीतावर सुंदर असे नृत्य केल्याने अध्यक्षांसह उपस्थित मान्यवर मंडळींनी कौतुक केले व तिचा सन्मानही केला.
अध्यक्षीय भाषणात जगताप यांनी आजी-माजी सैनिक संघटना यांचे कौतुक करत त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामांचा लेखाजोखा वाचत त्यामध्ये पूरग्रस्त मदत ,सामाजिक कार्यक्रम ,परिरात वृक्षारोपण ,पोलीस कामात निस्वार्थ सहकार्य तसेच तालुक्यातील सामाजिक कार्यक्रमात उस्फुर्त असा सहभाग नोंदवत असल्याने ,त्यांच्या या कार्याला सलाम करत त्यांना अमृत महोत्सवी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आरोग्य धनसंपदा हेल्थकेअर सेंटरचचे मुख्य ओंकार जगताप यांच्या मार्फत रोहिणी गोळे ,प्रदीप गोळे यांनी उपस्थित सैनिक तसेच मान्यवरांची मोफत आरोग्य तपासणी केली .
सोमेश्वर येथे असणारी ध्येयस्फूर्ती सेवाभावी सामाजिक शैक्षणिक संस्थेचे रुद्र वीर अकॅडमी सदस्य मुलींनी सैनिक व मान्यवरांना बांधवांना राखी बांधण्यात आली.
आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,उपाध्यक्ष भगवान माळशिकारे ,शेलार साहेब, सचिव पंकज कारंडे ,खजिनदार किरण सोरटे ,स्पोर्ट अकॅडमी अध्यक्ष भाऊसाहेब लकडे, माजी सैनिक राजाराम शेंडकर , मोहन गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, नितीन शेंडकर,युवराज चव्हाण, अशोक रासकर , गणेश शेंडकर ,मोहन शेंडकर दत्तात्रय चोरगे, अनिल चौधरी ,राजेभाऊ थोपटे ,भारत मदने, संजय पडवळ ,पांडुरंग मांडगे, बबन ढोपरे ,रवींद्र कोरडे, ज्ञानेश्वर कुंभार ,दिनकर फाटक सह प्रणाली शिक्षण संस्था अध्यक्ष बुवासाहेब हुंबरे ,करंजे सोसायटी संचालक सौ कुसुम बाळासाहेब शेंडकर , राहुल शेंडकर, मच्छिंद्र शेंडकर ,पत्रकार विनोद गोलांडे तसेच माजी सैनिक कुटुंब सदस्य व करंजेपूल ग्रामस्थ सह सोमेश्वर पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँडो.गणेश आळंदीकर यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार उपाध्यक्ष भगवान माळशिकारे यांनी मानले.