मुर्टी ! श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थांना "निहित संगम फाउंडेशन" वतीने मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत मुर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थांना निहित संगम फाउंडेशनच्यावतीने मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या. घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात मुर्टी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थांनी सहभाग घेतला.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहव्यात यासाठी १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत 'घरोघरी तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज उस्फुर्तपणे फडकवावा.
बारामती गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल