Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साथ प्रतिष्ठाण, लोणंद पोलिस स्टेशन व मालोजीराजे विद्यालय लोणंद यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आमंत्रित खो खो स्पर्धा संपन्न...

स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साथ प्रतिष्ठाण, लोणंद पोलिस स्टेशन व मालोजीराजे विद्यालय लोणंद यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य आमंत्रित खो खो स्पर्धा संपन्न...
स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साथ प्रतिष्ठाण, लोणंद पोलिस स्टेशन व मालोजीराजे विद्यालय लोणंद यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार दिनांक - 17 आगस्ट रोजी मालोजीराजे विद्यालय लोणंद च्या पठांगनावर भव्य आमंत्रित खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेमध्ये 
लोणी स्पोर्ट्स लोणी काळभोर, आपली माती क्रिडा प्रबोधिनी शिरुर . DM स्पोर्ट क्लब कोर्हाळे बु. भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब खेड बुद्रुक. नवरत्न स्पोर्ट क्लब नेवासा. वाघोशी क्रिडा मंडळ वाघोशी.दत्ताभाऊ क्रिडा मंडळ लोणंद, साथ प्रतिष्ठान क्रीडा मंडळ लोणंद . मालोजीराजे विद्यालय लोणंद आदी संघ सहभागी झाले होते, या स्पर्धेचे उद्घाटन लोणंद नगरिच्या नगराध्यक्षा मधुमती गालींदे (पलंगे), राज्य युवा फाउंडेशन चे अध्यक्ष महारुद्र तिकुंडे सर, दै. साहस वार्ता चे संपादक /मालक श्रीकांत मुळे, उपसंपादक अभिजीत मुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाजबाबा सुतार, आयुर्वेद सिटीचे सर्वोसर्वा डॉ. मिलिंद काकडे पाटील यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी साथ प्रतिष्ठाण च्या सामाजिक उपक्रमांचा डंका संपुर्ण सातारा जिल्ह्यांत असुन प्रतिष्ठाण चे कार्य कौतुकास्पद, आदर्शवत व युवा पीढ़ी ला प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार राज्य युवा फाउंडेशन महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी काढले, मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्षा मधुमती गालींदे (पलंगे) व आयुर्वेद सिटीचे सर्वोसर्वा डॉ. मिलिंद काकडे पाटील, साहस वार्ता चे संपादक श्रीकांत मुळे यांनी साथ प्रतिष्ठानचे उपक्रमांची वाहवा करून शुभेच्छा दिल्या. 
याप्रसंगी रेहबर-ए-जरिया फौंडेशन चे अध्यक्ष वसीमअक्रम शेख, खंडाळा तालुका वारकरी संप्रदाय चे अध्यक्ष सत्वशील शेळके पाटील,संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हा अध्यक्ष रफिकभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार खरात, युवा नेते निलेश शेळके पाटील, गोटे ग्रामपंचायत चे सदस्य साबिरभाई मुल्ला, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष रोहिदास कापसे, ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मणराव जाधव तात्या, हिमालय फाउंडेशन चे सचिव जाविदसर पटेल, युवा उद्योजक मोहंमदभाई मुल्ला, सुजन फाऊंडेशन चे अध्यक्ष अजित जाधव, रक्षक प्रतिष्ठाण चे सातारा जिल्हा अध्यक्ष पै. दस्तगीरभाई बागवान, युवा नेते राजाभाऊ खरात, लोणंद पोलिस स्टेशन चे शिवाजी दळवी साहेब, मालोजीराजे विद्यालय लोणंद चे उपप्राचार्य आबासो धायगुडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेतील विजेत्यांना युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील, संदीप शेळके पाटील, निलेश शेळके पाटील, सेवा निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती रोजाबी मुल्ला, शफीभाई मुलाणी, प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 7001 व चषक आपली माती क्रिडा प्रबोधिनी शिरुर , द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 5001 व चषक - दत्ताभाऊ क्रिडा मंडळ लोणंद, तृतीय क्रमांक पारितोषिक 3001 व चषक - लोणी स्पोर्ट्स क्लब लोणी व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक 2001 व चषक - साथ प्रतिष्ठाण स्पोर्ट क्लब लोणंद यांनी पटकाविले तर बेस्ट प्लेअर - चेतन बिका, उत्कृष्ट संघ - लोणी स्पोर्ट्स क्लब लोणी, उत्कृष्ट पंच धीरज दंडवते, उत्कृष्ट जंप - अभिजीत सनस, उत्कृष्ट खेळाडू - रामा डहाके आदींनी विशेष पारितोषिके देण्यात आली, या स्पर्धेसाठी पंच म्हणून मंगेश माने, शरद माने, ओमकार धायगुडे, अमोल कोळेकर यांनी काम पाहिले, 
स्पर्धा यशस्वीतेसाठी मालोजीराजे विद्यालय लोणंद च्या मुख्याध्यापिका सौ. साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, खजिनदार सचिन चव्हाण, कार्याध्यक्ष दिपक जाधव, कार्यकारिणी सदस्य सुनील रासकर, भावेश दोशी आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test