आज मंगळवार निरा डावा कालावा अस्तरीकरणा विरोधात शेतकरी कृती समितीचा कॅनाल बचाओ संघर्षमेळावा :- सतिश काकडे
कॅनॉल बचाओ संघर्ष मेळाव्यात मा. खासदार राजू शेट्टी साहेबाचे मार्गदर्शन होणार......
सोमेश्वरनगर - निरा डावा कालावा अस्तरीकरणा विरोधात शेतकरी कृती समितीचा उदया दि. ३० ऑगस्ट रोजी कॅनाल बचाओ संघर्ष मेळावा आयोजन केला आहे.
जेऊर, मांडकी, पिंपरे, निरा-शिवतकार, निंबुत, गुळूंचे, कर्नलवाडी, राख, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी,वाघळवाडी, वाणेवाडी, मुरूम, करंजे, करंजेपुल, सोरटेवाडी, शेंडकरवाडी, मगरवाडी, चौधरवाडी, वाकी,चोपडज, होळ, वडगांव निं, कोऱ्हाळे बु॥ कोन्हाळे खुर्द, लाटे, माळवाडी, कुरणेवाडी, शिरीष्णे व बारामती पर्यंत कॅनॉलच्या कमांड एरीयामध्ये असणाऱ्या सर्व गावांमध्ये गंभीर जलसंकट पुढील काळात ओढावणार असल्याने सर्व शेतकरी बांधवांनी जागे होवुन आपणा सर्वांवर येवु घातलेल्या पाणी संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येवुन निरा डावा कालव्याचे अस्तरीकरणाचे काम बंद करणे संबंधी आवाज
उठविला पाहिजे, जलसंपदा विभागाकडुन निरा डावा कालव्याची फक्त दुरुस्ती करणार आहोत व जेथुन पाणी गळती जास्त होत आहे तिथेच अस्तरीकरण करणार असल्याचे सांगीतले जात आहे. परंतु प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नसुन पुढील काही वर्षांत टप्या टप्याने पुर्ण कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येणार आहे अशी
खात्रीलायक माहिती मिळत आहे. दुरूस्तीच्या नावाखाली धरणापासुन ते बारामती पर्यंत ठरावविक ठिकाणी तळातुन व दोन्ही बाजुने अस्तरीकरणाचे काम विरोध न करता शेतकऱ्यांनी करून दिले तर पुढील काही वर्षातच निरा डावा कालव्याचे संपुर्ण अस्तरीकरणाचे काम केले जाईल व त्याचा परिणाम भविष्यात आपल्या सर्वांना भोगावा लागणार आहे. बारामती शहरात अस्तरीकरण झाल्यामुळे शहरातील बहुतांश बोअरचे पाणी बंद झालेले आहे. आपल्या भागात ही अस्तरीकरण झाल्यास भविष्यात तशीच परिस्थिती आपल्याकडे होणार आहे याची नोंद घ्यावी. म्हणुन वेळीच सर्व शेतकऱ्यांनी जागे होवुन आपआपल्या
भागात दुरूस्तीच्या नावाखाली होणाऱ्या अस्तरीकरणास विरोध केला पाहिजे.
वास्तविक निरा डावा कालव्याचे काम १९३० ते १४० वर्षापुर्वी ब्रिटीश सरकारने केले हे काम
करत असताना ब्रिटीशांनी हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली आणली. तसेच कॅनॉलच्या माध्यमातुन पाझरीकरण होवुन जमीनीत पाण्याचा स्त्रोत वाढेल व कॅनॉलच्या कमांड एरीयामध्ये भविष्यात विहीरी खोदल्या गेल्यास त्या विहीरींना ही पाणी लागेल व त्याच्या मुळे हजारो हेक्टर जमीनी बागायत होतील
● या उद्देशानेच ब्रिटीश सरकारने त्यावेळेस अस्तरीकरण केलेले नसावे. मग आत्ताच कॅनॉलचे
अस्तरीकरण करण्याची सरकारला काय गरज भासली? अंदाजे २५ वर्षापुर्वी नाझरे धरण शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी बांधले गेले परंतु आजची परिस्थिती पाहिली तर त्या धरणातुन जेजुरी M.I.D.C व आसपासचे इतर कारखाने यांना पाणी दिले गेले व तेथील शेतकऱ्यांच्या तोंडातला घास काढुन घेतला गेला. निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण झाल्यास कदाचीत पाणी वाढले तर हे सर्व पाणी भविष्यात कारखानदारीलाच दिले जाईल म्हणजे तीच परिस्थिती आपल्यावर येणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
तरी या गंभीर विषयावर सर्व शेतकऱ्यांनी वेळीच याचे गांभीर्य न ओळखल्यास तुमच्या आमच्या
सर्वांच्या घरावर नांगर फिरल्या शिवाय राहणार नाही व भविष्यात तुमची पुढील पिढी सुध्दा तुम्हाला
आम्हाला कधीही माफ करणार नाही! शेतकरी कृती समिती हे सर्व फक्त तुम्हाला जागे करण्यासाठी
करत आहे तसेच या पुढेही कृती समिती शेतकऱ्यांसाठी काम करत राहील, काही दिवसापुर्वी वर्तमान पत्राच्या माध्यमातुन अस्तरीकरण कामास स्थगीती मिळाली आहे असे सांगीतले जात आहे. परंतु शेतकरी बंधुना नम्म्रपणे सांगु इच्छितो की ही बामती खोटी आहे. तरी सर्वांनी राजकिय जोडे बाजुला ठेवुन,गटा - तटाचे राजकारण सोडुन पाणी हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न असल्याने हे तुमचे कर्तव्य समजुन या सभेमध्ये आपआपले मुद्दे मांडावेत जेणे करून कॅनॉल बचाओ संघर्ष समिती स्थापन करून मार्ग काढण्यासाठी, अजुन सविस्तर चर्चा होवुन पुढील दिशा ठरविणेसाठी व जो पर्यंत कॅनॉलच्या अस्तरीकरणाच्या कामास कायम स्वरूपीची स्थगिती मिळुन तसा लेखी आदेश निघत नाही तो पर्यंत हा लढा असाच सुरू राहील. तसेच कॅनॉल बचाओ संघर्ष मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांचे मार्गदर्शन होणार असुन मेळाव्यामध्ये वरील विषयांवर चर्चा होवुन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
चौकट....
मंगळवार दि. ३० रोजी सकाळी ११.०० वा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय निरा बारामती रोड निरा ता. पुरंदर येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन कृती समितीच्या वतीने
करण्यात येत आहे.
सतिश शिवाजीराव काकडे
अध्यक्ष, पुणे जिल्हा शेतकरी कृती समिती