सोमेश्वरनगर ! श्रावणी शेवटच्या सोमवारी पालखी सोहळा बैठक संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे येथे सोमेश्वर महाराज यांची श्रावण शेवटच्या सोमवारची पालखी सोहळा मोठ्या उत्साह संपन्न होत असतो या अनुशंगाने आयोजित मीटिंग संपन्न झाली
ही पालखी सोहळा नियोजन बैठक दिनांक 19 शुक्रवार रोजी देवस्थान भक्त निवास येथे संपन्न झाली .... मीटिंगमध्ये पालखी सोहळा श्रावणी शेवटच्या सोमवार दि २२ रोजी सकाळी ठीक नऊ वाजता महापूजा संपन्न होऊन पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक ...खोमणे भेटीसाठी रवाना दुपारी ठीक बारा वाजता ...शिवभक्त याठिकाणी दर्शनासाठी अर्धा तास वाढवून ठेण्यात येणार तसेच भेटी दरम्यान सोमेश्वर आरती करत भाविकांसाठी मंदिर परिसरात ... पारंपरिक वाद्याच्या गजरात मानकरी कडून मंदिराकडे पालखीचे प्रस्थान ...सोमेश्वर मंदिरात पालखी आल्यानंतर... आरती झाल्यानंतर मानकर यांना अंगारा भेट तसेच पालखी भाविकांना पालखी आरतीसाठी पुजारी व विश्वस्त कमिटी स्टेजवर उपस्थित राहतील....इतर कोण्हीही नागरिकांनी येऊ नये.येणाऱ्या सर्व भाविक ,मानकरी तसेच पंचक्रोशीतील मान्यवर पदाधिकारी मान्यवरांनी सहकार्य करावे.
या प्रसंगी बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, वडगाव निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे , देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रताप भांडवलकर ,सचिव राहुल भांडवलकर, विश्वस्त योगेश भांडवकर, सचिन मोकाशी सह पालखी मानकरी ,खांदेकरी...करंजे ग्रामस्थ व सोमेश्वर पंचक्रोशीतील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.