सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मगरवाडी या ठिकाणी असणाऱ्या शिवभक्त मेंढपाळ पडळकर कुटुंब आहे या पडळकर कुटुंबाने श्रावण महिना निमित्त श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी सोमेश्वर श्रींच्या मूर्तीची मोठी भव्य दिव्य लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात मिरवणूक निघत असते , या मिरवणुकीसाठी सामान्य कुटूंबातील मागरवाडी येथील शिवभक्त मेंढपाळ गजानन साळबा पडळकर कुटुंबीय यांनी सोमेश्वर श्रींच्या पालखी मिरवणुकीसाठी सुंदर व आखीव रेखीव अशी पालखी अर्पण केली आहे. सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष प्रताप भांडवलकर , सचिव राहुल भांडवलकर , खजिनदार सोमनाथ भांडवलकर सह विश्वस्त मंडळ यांनी त्यांचे आभार मानले व सोमेश्वर परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे तसेच ही नवीन पालखीची मिरवणूक रविवार दि ७ रोजी पडळकर कुटुंब व देवस्थान ट्रस्ट यांनी मोठ्या उत्साहात गुलालाची उधळण करत व पारंपारिक वाद्याच्या व हरहर महादेव च्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली व दुपारी बाराच्या सुमारास सोमेश्वर आरती प्रसंगी श्रींची मूर्ती यामध्ये विराजमान करण्यात आली यामुळे पालखी व श्रींची मूर्ती व सजवलेली पालखी श्रावण महिन्यानिमित्त दर्शनासाठी आलेल्या सर्व शिवभक्तांना पहावयास मिळाले तसेच याप्रसंगी मगरवाडी येथील शिवभक्त मेंढपाळ व्यावसाय करणारे सर्व पडळकर कुटुंब व ग्रामस्थ उपस्थित होते.