महत्वाची सूचना - भामा आसखेड धरण
भामा आसखेड धरण जलाशय पातळी सकाळी १० वाजता ६७०.९० मी आणि एकूण पाणीसाठा *(२२१.५१३ दलघमी ९५.७९ %)* झाला आहे. भामा आसखेड प्रकल्पात पाण्याचा येवा सुरू आहे.
पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा येवा बघता पूढील १० ते १५ तासात प्रकल्प ९८% होऊ शकतो त्यानंतर पाणलोट क्षेत्रातील पाऊस व पाण्याचा येवा यानुसार सांडव्यावरून भामा नदीत विसर्ग सोडण्यात येणार आहे.
नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.
🌊 भामा आसखेड धरण पूर नियंत्रण कक्ष🌊