स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तीन दिवस ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन
बारामती - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक १३, १४ व १५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०९:०५ वाजता प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदनाचा व संचालनाचा शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
नवीन प्रशासकीय इमारत, बारामती येथे होणा-या या ध्वजारोहण समारंभास शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी १३, १४ व १५ ऑगस्ट रोजी मुख्य कार्यक्रमाच्या १० मिनिटे अगोदर राष्ट्रीय पोषाखात उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार विजय पाटील यांनी केले आहे.