सातारा ! वर्ये हायस्कूलमधून ....सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी पर्यावरणपूरक राख्या
तब्बल दीडशे राख्या बनवून गुजरात च्या युनिटला पाठवल्या
सातारा - जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल वर्ये येथे " एक राखी सैनिकांसाठी " अशीच काहीशी साद घालत भारत देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी वर्ये येथील जयसिंगराव मल्हारी हायस्कूल वर्येच्या विद्यार्थिनीं व विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक राख्या तयार केल्या आणि आपले बंधू प्रेम यातून व्यक्त केले आहे . भारतमातेचे रक्षण करणारे , सदैव देशासाठी झटणाऱ्या अशा सैनिकांना आपल्या बांधवांसाठी विद्यार्थीनींनी व विद्यार्थ्यांनी मेहनत करून तब्बल दीडशे राख्या बनवून गुजरात च्या युनिटला पाठवल्या .राख्यांसोबत विद्यार्थिनींनी सैनिकांसाठी शुभ संदेश पाठवले असून सैनिकांकडून देश रक्षणाचे महान व पवित्र कार्य केले आहे यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ . वाघमारे सुनिता सुभाष यांच्या प्रेरणेने हा उपक्रम घेण्यात आला . सांस्कृतिक विभागामार्फत हा अभिनव उपक्रम घेण्यात आला .या उपक्रमासाठी सौ . शुभांगी तानाजी कुंभार यांनी या उपक्रमाचे आयोजन केले .विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा नाविन्यपूर्ण उपक्रम दिशादर्शक व प्रेरणादायी ठरला .या उपक्रमासाठी श्रीम . नंदा सावंत , सौ . उज्वला पाटील सौ . रुपाली कचरे ,सौ . वासंती जाधव,श्रीम. वैशाली फडतरे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले . विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा उपक्रम सर्व विद्यार्थ्यांना अतिशय आवडला आणि त्यांनी ही याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला . पर्यावरण पूरक राख्या बनवताना धान्य, बिया , कागदाची किमया , टाकाऊ पासून टिकाऊ , टिकल्या ,मणी , रंगीबेरंगी दोरे इ .या सर्वांचा वापर करून अतिशय सुंदर अशा राख्या बनवलेल्या आहेत . या उपक्रमाचे सर्व पंचक्रोशीतून खूप कौतुक होत आहे .या उपक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .