Type Here to Get Search Results !

इंदापूर ! रणसिंग महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियान जनजागृती

इंदापूररणसिंग महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियान जनजागृती 
इंदापूर -  इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापुर  येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना ,विद्यार्थी कल्याण मंडळ व पूर्वनिहीत संगम फाउंडेशन बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने उपस्थित विद्यार्थ्यांना हरघर तिरंगा निमित्त २०० ध्वज वाटप करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य सरकारच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.शासन निर्णयानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती कोरल्या जावून स्वतंत्र संग्रामातील ज्ञात अज्ञात क्रांतिवीर यांच्या आठवणी,देशभक्तीची भावना जन माणसाच्या हृदयात कायम तेवत राहावी या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंकुशराव आहेर यांनी सांगितले.यावेळी ध्वजसंहिता बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रप्रेम देशप्रेम याबाबत मनामध्ये अभिमान जागृत होवून देश निष्ठा निर्माण होईल यातून राष्ट्रविकास घडून येईल असे मत प्राचार्य डॉ अंकुश आहेर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ रामचंद्र पाखरे,प्रा.ज्योत्स्ना गायकवाड,विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे,डॉ. विजय केसकर,डॉ. सुहास भैरट,प्रा प्रशांत शिंदे,प्रा ज्ञानेश्वर गुळीग,कार्यालय अधीक्षक मिलींद वाघमारे ,लिपीक अमोल चव्हाण  इ मान्यवर तसेच कला ,वाणिज्य ,विज्ञान शाखा प्राध्यापक वृंद  व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test