निधन वार्ता ! शिरूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन
शिरूर : जिल्यातील शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री बाबुराव पाचर्णे यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षांपासून ते गंभीर आजाराने ग्रस्त होते. मात्र काही दिवसांपासून त्यांचा आजार बळावला आणि प्रकृती ढासळली. त्यातच आज दुपारच्या सुमारास बाबुराव पाचर्णे यांची शिरूर येथे प्राणज्योत मालवली आहे.