Type Here to Get Search Results !

एसटीच्या माध्यमातून ‘घरोघरी तिरंगा! उपक्रमाबाबत जनजागृती

एसटीच्या माध्यमातून ‘घरोघरी तिरंगा! उपक्रमाबाबत जनजागृती
पुणे, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या वतीने या उपक्रमाबाबत एसटी बसवर फलक लावून जनजागृती करण्यात येत आहे. स्वारगेट आगारातून आज या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आल्याची माहिती  स्वारगेट आगार व्यवस्थापिका शिवकन्या थोरात यांनी दिली.

स्वारगेट बसस्थानकावरून प्रमुख महामार्गावर जाणाऱ्या बसेसला हर घर तिरंगा उपक्रमाबाबत जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत.
एसटीच्या माध्यमातून गावागावात या उप्रकमाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार आहे. तसेच स्वारगेट बसस्थानकात ‘हर घर तिरंगा! उपक्रमाबाबत उद्घोषकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test