Type Here to Get Search Results !

पुणे ! भारतीय पत्रकार संघ(AIJ) लिगल विंग महाराष्ट्र राज्य व साहित्य लोभस परिवार तर्फे पत्रकार भवन पुणे येथे ॲड एम के कुलकर्णी यांना "जीवन गौरव पुरस्कार"ने सन्मानित.

पुणे ! भारतीय पत्रकार संघ(AIJ) लिगल विंग महाराष्ट्र राज्य व साहित्य लोभस परिवार तर्फे पत्रकार भवन पुणे येथे ॲड एम के कुलकर्णी यांना "जीवन गौरव पुरस्कार"ने सन्मानित.
पुणे - भारतीय पत्रकार संघ(AIJ) लिगल विंग महाराष्ट्र राज्य व साहित्य लोभस परिवार तर्फे पत्रकार भवन पुणे येथे ॲड एम के कुलकर्णी यांना "जीवन गौरव पुरस्कार"ने सन्मानित.ॲड.कैलास पठारे चेअरमन महाराष्ट्र लीगल विंग भारतीय पत्रकार संघ व जयंत शिंदे संपादक,साहित्य लोभस दिवाळी विशेषांक वृत्त जेष्ठ आयकर सल्लागार ॲड.मधुकर काशिनाथ कुलकर्णी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान.
      आयकर तसेच करविषयक कायद्यातील जेष्ठ व निष्णात वकील यांना भारतीय पत्रकार संघ लीगल विंग महाराष्ट्र राज्य व साहित्य लोभस परिवारातर्फे त्यांचे आयकर कायदाक्षेत्रातील पंचावन्न वर्षांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरवपुरस्काराने सन्मानित करण्यात आले सी.ए. सुधीर पंडित, सी.ए.दीपक कोतवाल व पराग ठाकूर (अध्यक्ष,ढोलताशा महासंघ) यांच्या शुभहस्ते ॲड.मधुकर कुलकर्णीसरांना गौरविण्यात आले.८९ व्या वर्षीसुद्धा सर आयकर सल्लागार या व्यवसायात कार्यरत आहेत त्यांचेविषयी प्रमुख पाहुण्यांनी गौरवोद्गार काढले;कुलकर्णीसरांच्या कामाच्या अनुभवांवर अनेक आजी आणी माजी आयकर आधिकारी भरभरुन बोलले.
    साहित्य लोभसचे व्यवस्थापक ॲड.वसंत शिंदे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.व्यासपीठावर भारतीय पत्रकार संघ(AIJ)लीगल विंग महाराष्ट्र चेअरमन ॲड.कैलास पठारे; उपाध्यक्ष ॲड.पांडुरंग ढोरेपाटील; सचिव ॲड. योगेश तुपे व साहित्य लोभसचेअरमन संपादक जयंत शिंदे होते.
  साहित्य लोभसचेअरमन कार्यकारी संपादक ॲड.शिरीष शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test