Type Here to Get Search Results !

CRIME NEWS - ७२.६८ कोटींच्या बनावट बिलांचा व्यवसाय करणाऱ्या ..... व्यापाऱ्यास अटक

CRIME NEWS - ७२.६८ कोटींच्या बनावट बिलांचा व्यवसाय करणाऱ्या ..... व्यापाऱ्यास अटक
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने जवळपास ७२.६८ कोटींच्या बनावट खरेदी विक्री विग्नांच्या
आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडीट घेऊन व तसेच टॅक्स क्रेडीट पास ऑन करून शासनाचा १३.०८ कोटींच्या कर महसुलाची हानी करणान्या व्यापान्यास अटक केली आहे. वस्तू व सेवाकर विभागाकडील उपलब्ध विविध विश्लेषण प्रणाली च्या आधारे सखोल विश्लेषण करून सदर करचोरीचा शोध घेण्यात आला. मे. शिव स्टील ट्रेडर्स या व्यापायाच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधात विशेष अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस बिलासंदर्भात सुरु असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत दौलत शिवलाल चौधरी यांना दि. १३/०७/२०२२ अटक करण्यात आली आहे. मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांनी सदर व्यक्तीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर धडक कारवाई श्रीमती रेश्मा घाणेकर, राज्यकर सहआयुक्त, पुणे व श्री. सुधीर चेके, राज्यकर उपायुक्त, अन्वेषण, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा राज्यकर आयुक्त, अन्वेषण श्री. हृषीकेश अहिवळे, चंदर कांबळे, प्रदीप कुलकर्णी, श्रीकांत खाडे व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी राबवलो.संपूर्ण कारवाई दरम्यान. धनंजय आखाडे, अप्पर राज्यकर आयुक्त, पुणे क्षेत्र, पुणे यांचे मार्गदर्शन मिळाले.
● सर्वसमावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करून आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवेगीरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा कसून शोध घेत आहे. या मोहीमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत २७ अटक कारवाया करण्यात आल्या आहेत व याद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचोरी करणान्या व्यापान्यांना एक प्रकारे इशारा दिलेला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test