शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल...!
बोगस नोकरी करणं पडलं महागात..दोन ठिकाणी नोकरी करून मिळविला पगार..
वडगांव निंबाळकर- बोगस हजेरीपत्रक, पगारपत्रक व सेवा पुस्तकात खोट्या व बनावट नोंदीची कागदपत्रे तयार करून संगणमताने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संदीप हनुमंत गाडेकर (वय ४६ वर्ष, रा चोपडज ता.बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
रामचंद्र नारायण भंडलकर ( वय ६१ वर्ष, रा.चोपडज ता.बारामती), पुष्पलता निवृत्त दिसले लग्ना नंतरचे नाव पुष्पलत्ता बाळासाहेब जगताप, (वय ५२, रा चोपडज ता. बारामती), रमेश विठठल भोसले (वय ६१ वर्ष,धंदा -निवृत्त य़ंशवत चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ कानाडवाड रा: कानाडवाडी ता बारामती ) व एक अज्ञात नाव पत्ता माहित नाही. अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार १८/०२/१९९७ पासून ११/०७/२०२२ या कालखंडात बारामती तालुक्यातील पांढरवाडी, चोपडज येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत नोकरी केली नसताना बोगस हजेरीपत्रक, पगारपत्रक व सेवा पुस्तकात खोट्या व बनावट नोंदीची कागदपत्रे तयार करून संगणमताने शासनाची फसवणूक करून एकाच वेळी दोन ठिकाणाहून पगार मिळवला आहे. तसेच दिनांक २५ एप्रिल १९९७ नंतर आरोपी पुष्पलता दिसले ( पुष्पलत्ता जगताप ) यांची यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ कानाडवाडी या संस्थेची नियुक्ती नसताना तसेच शिक्षणाधिकारी (माध्य) पुणे यांची कोणतीही मान्यता नसताना शासनाची फसवणूक करून आज अखेर बोगस नोकरी केली आहे. व पगार मिळवलेला आहे. फिर्यादीची व विद्यार्थ्यांची वरील आरोपींनी मिळून विश्वासघात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार खोमणे करीत आहे.