Type Here to Get Search Results !

बारामतीतील... त्या प्रसिद्ध देवस्थान येथे दुकानाच्या जगेवरून दोन गटात मारामारी.

बारामतीतील... त्या प्रसिद्ध देवस्थान येथे दुकानाच्या जगेवरून दोन गटात मारामारी.
सोमेश्वरनगर - बारामती तालक्यातील  प्रसिध्द असलेल्या करंजे येथील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान परिसरात  दुकानांसाठी लागणाऱ्या जागेतून
झालेल्या वादात मंदीरातील पुजाऱ्यांच्या दोन गटात जोरदार मारामारी झाली त्या झालेल्या मारहाणीवरून v मिळालेल्या माहितनुसार वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोन्हीही बाजूकडील एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. छाया बाळासो भांडवलकर (रा. देऊळवाडी, करंजे) यांनी दिलेल्या फिर्यादीत
म्हटले आहे की, सोमेश्वर मंदीर परीसरात फुले व पेढ्याचे दुकान टाकण्याच्या कारणावरून फिर्यादीचे पती बाळासो भांडवलकर, मुले सागर व पंकज भांडवलकर यांना आरोपी राजेंद्र अरुण भांडवलकर, अरुण पांडुरंग भांडवलकर, विनोद विलास भांडवलकर, अपर्णा राजेंद्र भांडवलकर, विवेक
विलास भांडवलकर(सर्व रा.देऊळवाडी, करंजे) यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करत दमदाटी व शिविगाळ केली.
   तसेच विनोद भांडवलकर यांनी फिर्यादीचा डावा हात ओढत विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. दुपारी एक वाजता होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी
गेली असता वरील सर्व आरोपींनी फिर्यादीचे पती बाळासो, मुले सागर व पंकज यांना वरील कारणाने हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची फिर्याद दिली. दुसऱ्या बाजूने अपर्णा राजेंद्र भांडवलकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमेश्वर मंदीरात देवाच्या पाया पडण्यास जात असताना त्याठिकाणी सागर भांडवलकर, पंकज भांडवलकर, बाळासो भांडवलकर हे त्यांचे दुकान मंदीरासमोर लावत होते. त्यावेळी सागर व पंकज यांनी
शिवीगाळ, दमदाटी करून पंकज भांडवलकर यांनी विनयभंग केला. सागर याने माझे केस धरून रस्त्यावरून ओढले.त्यावेळी बाळासो भांडवलकर यांनी पोटात लाथा मारून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून
वडगाव पोलिसांनी सागर बाळासो भांडवलकर, पंकज बाळासो भांडवलकर, बाळासो विश्वनाथ भांडवलकर, छाया बाळासो भांडवलकर (रा. सर्व देऊळवाडी, करंजे) यांच्यावर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील
तपास वडगाव निंबाळकर पोलिस ( ता बारामती) ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल दूरक्षेत्राचे पोलीस निरीक्षक योगेश शेलार हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test