पुणे जिल्हा क्षेत्रात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा.
पुणे जिल्हा क्षेत्रात हवामान विभागाने दि. ०८/०७/२०२२ ते दि. ११/०७/२०२२ रोजी या
कालावधीत रेड अलर्ट जारी केला असुन अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. तरी सर्व
नागरिकांना सुचित करण्यात येते कि, कामाच्या व्यतिरिक्त घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे.
तसेच पर्यटन स्थळे, धबधबे, या ठिकाणी जाणेचे अथवा वात्सव्य करण्याचे टाळावे.
आपत्ती व्यवस्थापन विभाग,जिल्हा प्रशासन, पुणे