फोटो ओळ - कळंब ता इंदापूर येथे जयंती निमित्ताने वृक्षारोपण करताना मान्यवर
इंदापूर - इंदापूर पंचायत समिती माजी सभापती तथा इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय विश्वासराव रणसिंग यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव विरसिंह रणसिंग , विश्वस्त शिवाजी रणवरे, विश्वस्त कुलदीप हेगडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुशराव आहेर, उपप्राचार्य डॉ.अरुण कांबळे यांच्या हस्ते विश्वासराव रणसिंग दादा यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले.दादांच्या जयंतीनिमित्त संस्था संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय तावशी ,माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी प्रांगणात वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, रांगोळी स्पर्धा,अपघातग्रस्त विद्यार्थिनी अर्थसहाय्य करण्यात आले. इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान या संस्थेची वाटचाल डॉ.सुहास भैरट यांनी तयार केलेल्या माहितीपटद्वारे दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुशराव आहेर यांनी केले. दादांच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते वृक्ष भेट देण्यात आले. उपप्राचार्य डॉ. अरुण कांबळे यांनी दादांच्या जयंतीनिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या व दादांच्या सामाजिक राजकीय व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. प्रा. रविराज शिंदे यांनी संस्थेबद्दलची दादांची भूमिका, धोरण आणि वाटचाल याची माहिती दिली. प्रा. आर. एन. डांगे यांनी दादांचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि धोरणात्मक निर्णयक्षमता याविषयी मत व्यक्त केले. संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी दादांचा वसा व वारसा समर्थपणे पुढे नेण्याचा निश्चय व्यक्त केला. दादांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. संस्था प्रगतीपथावर नेण्याचा विचार व्यक्त केला. याप्रसंगी मुख्याध्यापक मारुती वणवे, महादेव वणवे, कला विभाग प्रमुख डॉ रामचंद्र पाखरे, प्रा.प्रशांत शिंदे, प्रा. ज्योत्स्ना गायकवाड, डॉ विजय केसकर, ग्रंथपाल विनायक शिंदे , शिवाजी कदम ,महाविद्यालयातील प्राध्यापक माध्यमिक विद्यालयातील शिक्षक,विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच सूत्रसंचालन प्राध्यापक तेजश्री हुंबे व आभार- प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांनी मानले.
फोटो ओळ - कळंब ता इंदापूर येथे जयंती निमित्ताने वृक्षारोपण करताना मान्यवर