बारामती ! हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अतिशय उत्साहात गुरुपौर्णिमा साजर
"गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम
आणि अखंड वाहणारा झरा".
बारामती - महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी च्या हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये अतिशय उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून करण्यात आली. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताचे गायन केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य श्री. गणेश शास्त्री उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी 'गुरूने दिला ज्ञानरूपी वसा' या कवितेचे सादरीकरण केले. तसेच संगीत शिक्षिका सौ.अपर्णा गोळे यांनी गीत गायन केले.
प्रसिद्ध गुरू-शिष्यांच्या जोड्यांचे सादरीकरण पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी केले.तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच संस्कृत भाषेत आपल्या भाषणातून गुरूंचे महत्त्व स्पष्ट केले.
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अपर्णा इनामदार यांनी केले.आभार सौ. प्राची नाईक यांनी मानले.
शाळेची सजावट व इतर कामे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर यांनी केले.