'श्री म्हसोबा मंदिर' गायकवाडवस्ती येथे फुलझाडीचे वृक्षारोपन.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजेपुल गायकवाड वस्ती व सोमेश्वर पंचक्रोशतील नागरिकांचे श्रद्धा स्थान म्हणून 'श्री म्हसोबा मंदिर' कडे पहिले जाते, काही महिन्यांपूर्वी या मंदिराची खुप दुरवस्था झालेली असल्याने तेथील वस्तीतील युवक तरुण व ज्येष्ठांनी एकत्र येत लोकवर्गणीतुन मंदिर भव्य दिव्य करण्यात आले आहे. तसेच स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते मंदिर परिसरात विविध प्रकारची फुलझाडी लावण्यात आली.
या फुलाझाडी मुळे नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिर परिसर सुशोभित दिसणार असल्याचे समाधानही जेष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले
याप्रसंगी हनुमंत गायकवाड , सोपान गायकवाड , प्रल्हाद गायकवाड , रामदास गायकवाड ,विजय गायकवाड, नामदेव गायकवाड ,धन्यकुमार गायकवाड ,शशिकांत गायकवाड ,संपत गायकवाड लालासो सावंत इत्यादी सह वस्तीतील युवक मित्रपरिवार उपस्थित होते