Type Here to Get Search Results !

बारामती ! रोटरी क्लब ऑफ बारामती अध्यक्षपदी डॉ. अजय दरेकर यांची निवड

बारामती ! रोटरी क्लब ऑफ बारामती अध्यक्षपदी डॉ. अजय दरेकर यांची निवड
फोटो - बारामती येथे रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ पार पडला.

बारामती - रोटरी क्लब ऑफ बारामती अध्यक्षपदी डॉ. अजय दरेकर यांची तर सचिवपदी अरविंद गरगटे यांची एकमताने निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पदग्रहण समारंभात प्रांतपाल अनिल परमार व पोलिस उपअधिक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते दरेकर, गरगटे यांना अधिकार सुपूर्द करण्यात आले.     रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या वतीने नुकताच बारामती येथे पदग्रहण समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी अनिल परमार होते. याप्रसंगी सहायक प्रांतपाल निखिल मुथा, पल्लवी साबळे, अजय चौधरी, राजेस राऊत, पंकज पटेल, नितीन ढमाले, माधव तिळगुळकर, संतोष मराठे, चारूचंद श्रोत्री, संतोष गिरंगे, राजेंद्र भवाळकर, रूपेश कांबळे, सुभाष चांदगुडे, डॉ. अमोल खाानवरे उपस्थित होते. यानिमित्ताने बारामती तालुका मुख्याध्यापक संघ, भारत ज्ञान विज्ञान समुदाय, निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान यांचे पदाधिकारीही उपस्थित होते.
गणेश इंगळे यांनी, रोटरी क्लबने शाळांच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे अशी प्रशस्ती करतानाच यापुढील काळात जे विकासापासून वंचित व मागास राहिलेत त्यांच्यासाठी उपक्रम राबवावेत असे आवाहन केले. अनिल परमार यांनी नवीन कार्यकारिणीने ऊसतोडणी मजुरांसाठी व सरकारी शाळांसाठी विविध उपक्रमांचे नियोजन केल्याबद्दल कौतुक केले. डॉ. अजय दरेकर यांनी, बारामती तालुक्यातील सर्व ६५ विद्यालयांसोबत सॅनिटरी नॅपकीन वाटप, वृक्षारोपण, नवीन शैक्षणिक धोरणाची चर्चा असे विविध उपक्रम राबविण्याचा तसेच सोमेश्वर कारखान्यावरील ऊसतोड मजुरांना ऊसतोडीवेळी उपयोगी पडणारे साहित्य पुरविण्याचा संकल्प मांडला. याप्रसंगी रोटरी क्लबमध्ये डॉ. प्रवीण ताटे, अभिजित बर्गे, चेतन खटावकर, सुजय व्होरा, आनंद गादिया यांनी नूतन सदस्यपदाची नोंदणी केली.

चौकट ः नूतन कार्यकारिणी
रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या उपाध्यक्षपदी डॉ. हनुमंत पाटील व खजिनदारपदी रविकिरण खारतोडे यांची निवड झाली. तर पदसिध्द सदस्य म्हणून दर्शना गुजर, संजय दुधाळ यांना नियुक्ती मिळाली. तर कार्यकारिणी सदस्य म्हणून किशोर मेहता, अलि असगर बारामतीवाला, गणेश कुंभार, मल्लिकार्जुन हिरेमठ, डॉ. सचिन मदने, सचिन चावरे, प्रतिक दोशी, कौशल शहा, प्रिती पाटील, दत्ता बोराडे यांना संधी मिळाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test