सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठान च्या विद्यार्थ्यांनी अनुभवला कारगिल युद्धाचा चित्तथरार...
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल , सीबीएसई वाघळवाडी येथे कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून सोमेश्वर- करंजे परिसरातील निवृत्त मेजर व कारगिल युद्धातील प्रत्यक्ष सहभागी असलेले श्री बाळकृष्ण शिवराम रासकर यांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी श्री राजाराम शिंदे व श्री नितीन शेंडकर हे भारतीय सैनिक उपस्थित होते.
कारगिल विजय दिवसानिमित्त सोमेश्वर परिसरातील आजी-माजी सैनिकांची रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाळेतील चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी रॅलीला मानवंदना दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मेजर श्री बाळकृष्ण रासकर यांनी तत्कालीन राजकीय परिस्थिती, युद्धनीती तसेच सैनिकांची युद्धासाठी ची तयारी व सहभाग , निसर्गाची प्रतिकूल परिस्थिती व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारगिल टेकडीच्या माथ्यावर बसलेल्या शत्रूचा भारतीय जवानांनी कसा सामना केला याचे अत्यंत रंजक व चित्तथरारक असे वर्णन केले.
याप्रसंगी सोमेश्वर तसेच परिसरातील विद्यार्थ्यांनी करियर म्हणून सैनिकी शिक्षणाचा विचार करावा असा सल्ला व मार्गदर्शन सरांनी केले.यावेळी शाळेतील स्वरंधरा संगीत मंचाने देशभक्तीपर गीतमाला सादर करून सभागृहातील प्रेक्षक तसेच पाहुण्यांचे मन देशभक्तीपर वातावरणाने भारावून टाकले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सारिका काकडे यांनी केले .सदर कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.