सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवार दिनांक ५जुलै रोजी करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांचे शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सहसचिव सतीश लकडे, विक्रम काकडे उपस्थित होते.ओम साई हेल्थ सेंटर पुणे येथील अल्ताफ शेख, मिरखान पठाण व प्रियंका सपकाळ यांनी आधुनिक मशीनच्या सहाय्याने कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली.महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये प्रामुख्याने सर्व कर्मचाऱ्यांचे वजन व उंची यांचे मापन करून त्यांचा BMI किती आहे याबाबत कर्मचाऱ्यांना माहिती करून दिली तसेच सद्यस्थितीमध्ये त्यांच्या शरीराची स्थिती काय आहे. उंचीच्या मानाने वजनाचे प्रमाण,शरीरातील चरबीचे प्रमाण याचे मोजमाप आधुनिक माशिनच्या साह्याने करुन रोजच्या दैनंदिन जीवनातील आहाराचे महत्व विषद केले.
महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी अंतर्गत शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने प्रा.डॉ. बाळासाहेब मरगजे यांनी शिबिराचे आयोजन केले. प्रा.दत्तराज जगताप डॉ.श्रीकांत घाडगे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जगन्नाथ साळवे, डॉ.जया कदम,डॉ.प्रवीण ताटे- देशमुख, प्रा.रजनीकांत गायकवाड आय क्यू ए सी समन्वयक डॉ संजू जाधव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.