Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! सोमेश्वर कारखान्याचे रोलर पुजन संपन्न.

सोमेश्वरनगर !  सोमेश्वर कारखान्याचे रोलर पुजन संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर कारखान्याचे रोलर पुजन संपन्न  समारंभ गुरुवार दि. १४ जुलै रोजी कारखान्याचे संचालक शांताराम कापरे , किसन तांबे यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे अध्यदा  पुरुषोत्तम जगतान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष जगताप म्हणाले की, आपण मागील गाळप हंगामात १३ लाख २५ हजार ३९५ मे.टन ऊसाचे गाळप केले असुन यातुन बीहेव्हीसह सरासरी ११.९९ टक्केचा साखर उतारा राखत १५ लाख ५४ हजार ६२५ साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. सोबत कारखान्याच्या कोजन प्रकल्पामधुन ११ कोटी ३७ लाख ५४ हजार ९६९ युनिट्स वीजनिर्मिती केली असुन ७ कोटी २२ लाख २४ हजार ५०८ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातून १ कोटी ११ लाख ५० हजार लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असुन ४८ लाख ९५ हजार ८३२ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आह.जगताप पुढे म्हणाले की, येणा-या गाळप हंगानासाठी कारखान्यातील अंतर्गत कामे प्रगतीपथावर असुन कारखान्याने केले केलेल्या विस्तार वाढ  प्रकल्पाची यशस्वी ट्रायलही गत हंगामात पार पडली आहे. जगताप पुढे म्हणाले की, येणा-या हंगामासाठी तोडणी वाहतुक यंत्रणेचे करारही आपण सुरु केले असून आजपर्यंत ९०० बैलगाडी, २५० डंपीग, ५० ट्रक,३९० ट्रॅक्टर, १ हार्वेस्टरचे करार पुर्ण झाले असुन तोडणी वाहतुकीसाठी आपण पहिल्या हप्त्याचे वाटप १५ जुलैपासून करणार आहोत. तसेच श्री. जगताप पुढे म्हणाले की, आपल्या कारखान्याने गत हंगामात ऊसबीलापोटी ए २०,१२३ ऊस पुरवठादार शेतक-यांच्या खात्यावर प्रति मे.टन २८६७ रु. प्रमाणे ३८० कोटी रुपये
वर्ग केले आहेत. त्याचसोबत आपण कारखान्याच्या सर्व कामगारांचे वेळेत पगार करीत असुन गतवर्षी केलेल्या उत्कृष्ट कामकाजाबद्दल कारखान्याचे सर्व कायम व रोजंदारीत काम करणारे कामगार अधिकारी यांना १५ दिवसांचा पगार बक्षीस म्हणुन अदा केला असुन याची सुमारे १ कोटी ९ लाख रुपयाची रक्कमही आपण खात्यावर वर्ग केली आहे.जगताप पुढे म्हणाले की, येणा-या गळीत हंगामासाठी एकुण ४२ हजार ६८८ एकर ऊसक्षेत्राची नोंद झाली असून यात आडसाली २०७३४ एकर उसक्षेत्राची नोंद झालेली आहे. या नोंदलेल्या एकुण ४२ हजार ६८८ एकर ऊसक्षेत्रातुन बेणे व ईतर वजा जाता अंदाजे १५ लाख मे.टन ऊस आपणास गाळपासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या नोंदलेल्या संपुर्ण ऊसाचे आपल्या कारखान्यावर वेळेत गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. श्री. जगताप पुढे म्हणाले की, आपल्या कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत आपण राभासदांसाठी विवीध योजना राबवित असुन यामध्ये ताग, धैच्या, सोयाबीन तसेच आंबा, नारळ, पेरु या फळझाडाची रोपांचे अनुदानावर वाटप करीत असतो त्याचसोबत ऊधारीवर आपण ऊसदबेणे व ऊसरोपे याचे वाटप करीत असतो.  जगताप पुढे म्हणाले की, देशाचे जेष्ठ नेते खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब, राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय अजित पवार तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शेतकरी सभासद, कारखान्याचे कामगार अधिकारी, ऊस वाहतुकदार, ऊसतोडणी मजुर, कोन्ट्रॅक्टर या सर्वांच्या सहकार्याने आपण गत हंगाम यशस्वीपणे पार पाडला असुन येणारा हंगामही आपण निश्चितपणे यशस्वी पार पाडु असा मला विश्वास आहे.यावेळी कारखान्याचे संचालक  राजवर्धन शिंदे, सुनिल भगत, शिवाजीराजे निंबाळकर, विश्वास जगताप, बाळासाहेब कामथे, अजय कदम,  अभिजीत काकडे , ऋषिकेश गायकवाड,  रणजीत मोरे  अनिल तांबे,प्रविण कांबळे, हरिभाऊ भोंडवे, लक्ष्मण गोफणे,कमल पवार,प्रणिता खोमणे आदि संचालक व अधिकारी-कामगार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यकारी संचालक आर.एन. यादव यांनी केले तर आभार उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी मानले 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test