वीर धरण ८२.५३ % इतके भरले;नीरा नदीमध्ये पुढील २४ तासात विसर्ग सुटण्याची शक्यता
वीर - वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग सोडणेबाबत.वीर धरण दिनांक १४/०७/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता वीर धरणाची पाणी पातळी ५७८.३२ मी. इतकी असून उपयुक्त पाणीसाठा ७.७६ टीएमसी. झाला असून धरण ८२.५३ % इतके भरले असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सद्यस्थितीत संतत धार पाऊस पडत असून वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वीर धरणातून नीरा नदीमध्ये पुढील २४ तासात विसर्ग सुटण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सुरक्षिततचेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.