माजी उपमुख्यमंत्री,विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
ऑफरोड वारी २०२२ (फोर व्हीलर) स्पर्धा ग्रामीण भागात प्रथमच - अभीभैया काकडे-देशमुख
सोमेश्वरनगर - पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात प्रथमच ऑफ रोड वारी म्हणजे फोर व्हीलर ची स्पर्धा पहिल्यांदाच रविवार दिनांक 24 रोजी तालुक्यातील गरदडवाडी येथे विरजा खडी स्टोन क्रेशर येथे सकाळी 9 होणार आहे . यामुळे बहुतांशी ग्रामीण भागातील युवक तरुणांची व नागरिकांचे या स्पर्धा कशा असणार आहे याकडे लक्ष लागले आहे, कारण ग्रामीण भागात शक्यतो बैलगाडी स्पर्धा, सायकल स्पर्धेचे आयोजन केले जात होते परंतु सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभीभैया काकडे-देशमुख यांनी मा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच ऑफरोड वारी म्हणजे फोर व्हीलर गाड्यांची स्पर्धा चे आयोजन केले आहे. या अगोदर त्यांनी हॉकी ,हॉलीबॉल, क्रिकेट या स्पर्धा भरवल्या होत्या परंतु यावर्षी फोर व्हीलर च्या स्पर्धा कशा असतात ह्या ग्रामीण भागातील नागरिकांना अनुभवास यावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले
या स्पर्धेमध्ये जिप्सी, थार , स्कार्पियो, एम एम 550 ,जीप अशा पेट्रोल - डिझेल इत्यादी फोर व्हीलर गाड्या धावणार असून यामध्ये सांगली ,सातारा,कोल्हापूर, गोवा ,कर्नाटका ,पुणे मुंबई , सिल्वासा येथील स्पर्धक सहभाग नोंदवाला असल्याचेही माहिती आयोजकांनी दिली
स्पर्धेत सहभाग होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गाड्यांना कोणतेही फी आकारली जाणार नसल्याचे आयोजकांनी बोलताना सांगितले
ही स्पर्धा फॅमिली इव्हेंट असून पाहण्याचा लाभ सर्वानी घ्यावा
आयोजक...
अभीभैया काकडे युवामंच ,निंबुत
सपोर्टेड बाय इन लँडर, कोल्हापूर
टॉर्क फोर बाय फोर .