Type Here to Get Search Results !

श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित राज्यस्तरीय विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शन दि. २१ व २२ जुलै रोजी सोमेश्वरनगर येथे पार पडणार

श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित राज्यस्तरीय विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शन दि. २१ व २२ जुलै रोजी सोमेश्वरनगर येथे पार पडणार

सोमेश्वरनगर :- बारामती तालक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर या संस्थेच्या श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने व श्री शरदचंद्रजी पवार ग्रुप ऑफ इन्टिटयुट मार्फत राज्याचे विरोधी पक्षनेते मा.अजितदादा पवारसो यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त ग्रामिण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या तांत्रिक कलगुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील विज्ञान, शेती, अभियांत्रिकी, शास्त्र या क्षेत्रातील
माहिती अद्यायवत व्हावी या उद्देशाने प्रथमच भव्य राज्यस्तरीय विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शन व राज्यस्तरीय विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्प स्पर्धा दि. २१ व २२ जुलै रोजी आयोजित केली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी दिली. हे प्रदर्शन पहिल्यांदाच आयेजित केले असून या पुढील काळातही दरवर्षी आयोजित करण्यात येणार आहे.
    सदरील राज्यस्तरीय प्रदर्शन व स्पर्धा शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी,
मॅनेजमेंट सोमेश्वरनगर येथे पार पडणार असून राज्यस्तरीय विज्ञान व तंत्रज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी आणि तांत्रिक महाविद्यालयातील सर्व विभागाचे विद्यार्थी सहभागी होणार असून यासाठी एकूण तीन लाखांची एकूण बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र संस्थेमार्फत
दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या प्रदर्शनास सहभागी होण्यासाठी राज्यभरातून नांदेड, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, पुणे या व आदि जिल्हयातील सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामध्ये शालेय विभागातून २२९ प्रकल्पाची नोंदणी झालेली असून ४८८ विद्यार्थी सहभागी होणार आहेत तर महाविद्यालयीन गटातील १५८ प्रकल्पाची नोंदणी झालेली असून ४९५ विद्यार्थी सहभागी होणार आहेत ग्रामिण भागात राज्यपातळीवर पहिल्यांदाच असे भव्य विज्ञान प्रदर्शन व स्पर्धा पार पडणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवण्याचे अवाहन संस्थेचे सचिव  भारत खोमणे, मुख्य समन्वयक डॉ. संजय देवकर, समन्वयक प्रा. सोमनाथ हजारे, डॉ. अमोद मरकळे व डॉ. रामचंद्र पवार यांनी केले आहे. हे प्रदर्शन भव्य स्वरूपात पार पडण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष  संभाजी होळकर, गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test