सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील इयत्ता अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रम या वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, संस्थेचे सहसचिव श्री सतीश राव लकडे, व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.रवींद्र जगताप यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले याप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.जगताप सरांनी शैक्षणिक माहिती व शिस्त याविषयी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.