Type Here to Get Search Results !

... तहसील कार्यालयात विशेष लोकअदालतक्षेत्राचा मेळ बसत नसलेल्या ६७ सातबारांबाबत निर्णय

... तहसील कार्यालयात विशेष लोकअदालत

क्षेत्राचा मेळ बसत नसलेल्या ६७ सातबारांबाबत निर्णय
पुणे - ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ व १ ऑगस्ट महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर हवेली तहसील कार्यालयामध्ये विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सात-बारा संगणकीकरण अंतर्गत क्षेत्राचा मेळ बसत नसलेल्या अहवाल-१ मधील ६७ सात-बारांवर निर्णय घेऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली.

हवेली तालुक्यामधील १ लाख ६२ हजार ६३० सात-बारांपैकी अहवाल १ चे म्हणजेच क्षेत्राचा मेळ बसत नाही असे १ हजार ८९६ सातबारे शिल्लक आहेत. क्षेत्राचा मेळ बसत नसल्यामुळे हे सातबारे खातेदारांना मिळू शकत नाहीत. त्या मधील प्रकरणांची छाननी करून सुनावणीस पात्र १०० प्रकरणांसाठी लोक अदालत आयोजित करण्यात आली. लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व प्रांताधिकारी संजय आसवले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल नायब तहसीलदार, कर्मचारी यांच्या सहकार्याने ही लोकअदालत आयोजित करण्यात आली. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test