Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! श्रायबर डायनामिक्स डेअरीज् प्रा. लि. यांचेतर्फे उत्कर्ष आश्रमशाळेस धान्यस्वरूपामध्ये मदत.

सोमेश्वरनगर ! श्रायबर डायनामिक्स डेअरीज् प्रा. लि. यांचेतर्फे उत्कर्ष आश्रमशाळेस धान्यस्वरूपामध्ये मदत.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील उत्कर्ष आश्रमशाळा वाघळवाडी येथे आज शनिवार दि. ३० जुलै २०२२ रोजी बारामती येथील
श्रायबर डायनामिक्स डेअरीज् प्रा. लि. या कंपनीतर्फे Week of Giving या उपक्रमांतर्गत उत्कर्ष आश्रमशाळेतील मुलांसाठी "Doing Good Through Food" या उक्तीप्रमाणे समाजाचे आपण काहीतरी देणे आहोत या भावनेतून कंपनीमधील सर्व पदाधिकारी, कर्मचारी स्टाप यांचे मार्फत धान्यस्वरूपामध्ये उच्च प्रतिचा ५०० किलो गहू, ३०० किलो तांदूळ, १०० किलो तुरडाळ, ६० किलो हरभरा डाळ, ६० किलो  मूग डाळ भेट स्वरूपात देणेत आले. कंपनीचे HR मंजुश्री चव्हाण मॅडम आणि रावसाहेब मोकाशी यांनी आश्रमशाळेतील अनाथ निराधार व वंचित घटकातील मुलांबरोबर संवाद साधला मुलां-मुलींशी गप्पागोष्टी केल्या तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन केले. भविष्यामध्ये आश्रमशाळेतील मुलां-मुलींसाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले
भेट देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांमध्ये श्रायबर डायनामिक्स डेअरीज् प्रा.लि. चे सायली आटोळे
मॅडम, राजेश पांडे, ज्ञानदेव गिरवणे, प्रशांत कांबळे, संदीप सावंत व इतर स्टाप आलेले होते. पाहुण्यांचे स्वागत आणि आभार उत्कर्ष माध्य. व उच्च माध्य. आश्रमशाळेच्या प्राचार्या श्रीम. रोहिणी हनुमंतराव सावंत मॅडम यांनी फळांची वृक्ष रोपे, श्रीफळ व गुलाब पुष्प देवून केले. तसेच आपल्या मनोगतामध्ये व्यक्त होताना सावंत मॅडम यांनी पंचक्रोशीतील, परिसरातील दानशुर व्यक्तींना आश्रमशाळेतील अनाथ, निराधार व वंचित मुलां-मुलींसाठी धान्यस्वरूपामध्ये,कपडयास्वरूपामध्ये तसेच वस्तू स्वरूपामध्ये मदत करावी असेही आवाहन केले.
कार्यकमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचालन व आभार प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मोकाशी सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test