वाल्हे येथील मदने वस्तीत शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण
वाल्हे प्रतिनिधी – पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील मदने वस्तीत जवळपास १ हजार ५०० शेळ्या मेंढ्यांना रोगप्रतिबंधक लस देण्यात आली असल्याची माहिती पशु वैद्यकीय अधिकारी प्रशांत उटगे यांनी दिली .
वाल्हे परिसरात गेल्या काही दिवसापूर्वी रिमझिम पावसाची संततधार सुरु होती.मात्र सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी या पावसामुळे शेतांसह माळरानावरही कोवळ्या गवताची उगवण मोठ्या प्रमाणावर झाली आहे.परंतु या गवताचे शेळ्या मेंढ्यांनी जास्त सेवन केल्यास त्यांना आंत्रविषार नावाचा आजार होतो.आणि त्या आजारामुळे शेळ्या मेंढ्यांवर मृत्यू देखील ओढवतो. त्यामुळे अशा आजारांशी झुंज देता यावी यासाठी प्रत्येक शेळ्या मेंढ्यांना रोगप्रतिबंधक लस देणे तितकेच गरजेचे असल्याचे मत डॉ.उटगे यांनी व्यक्त केले.
या लसीकरणासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली धनगर समाजाचे नेते दादासाहेब मदने सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पवार यांसह संभाजी भंडलकर संजय गायकवाड शिवसेनेचे भाऊ मदने तसेच रामभाऊ मदने दशरथ मदने मारुती चव्हाण शिवाजी मदने आदी मान्यवरांनी सहभाग दर्शविला.