सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठान मध्ये गुरुपौर्णिमा आनंदात साजरी
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल सीबीएससी मध्ये गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी सोमेश्वर परिसरातील परिसरातील प्रसिद्ध वक्ते माननीय प्रा. हनुमंत माने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रा हनुमंत माने सरांनी अत्यंत सोप्या व सुबोध भाषेतून मुलांशी संवाद साधला पारंपारिक गुरुकुल पद्धती तसेच आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये गुरूंचे असलेले अढळ स्थान तसेच गुरूंचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले आई वडील व गुरु या त्रिसूत्रीचा जीवनात कसा सहभाग असतो व त्यांचा सन्मान कसा करावा हे आपल्या सहज सोप्या शैलीतून सरांनी मुलांना सांगितले या प्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक तसेच शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक उपस्थित होते कार्यक्रमात स्वरांधरा गीतमंचाने सुस्वर गायन सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता पवार यांनी केले या सर्व कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील प्रीती जगताप यांनी केले