अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यासंदर्भात जनजागृती शिबीर संपन्न
पुणे, दि.१: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ कायद्यासंदर्भात महिलांचे अधिकार व हक्क या विषयांवर कायदेशीर जागरुकता निर्माण होण्यासाठी विशेष कायदेविषयक शिबीराचे मुलींचे राज्यगृह, मुंढवा येथे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती मंगल दीपक कश्यप, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती प्रचिता किशोर राठोड, ॲड. प्रीती परांजपे, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश एस.एस. घोडके, महिला राज्यगृहाच्या अधिकारी श्रीमती मोरे आणि पिडीत महिला उपस्थित होत्या.