रणसिंग महाविद्यालयाच्या वतीने पालखीचे स्वागत
इंदापूर , इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता इंदापूर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या सयुक्त विद्यमाने आषाढी पायीवारीसाठी निघालेल्या श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा सासवड व श्री संतराज महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र संगम रांजणगाव वाळकी बेट पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना महाविद्यालयाच्या वतीने २००० बिस्किट पुडे व लोणचे पाकीटे वाटप करण्यात आली. श्री संतराज महाराज पालखी सोहळा प्रमुख हभप सुरेश महाराज साठे यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंकुश आहेर यांनी केले. कोरोना काळात आषाढीवारी घडली नाही. त्यामुळे या वर्षी वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी आस लागली असल्याने हरीनामाच्या भक्तिमध्ये तल्लीन होऊन वारकरी ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता विठुरायाच्या दर्शनासाठी निघाला आहे.वारीमध्ये ज्ञानोबा तुकाराम नामघोषात वाटचाल करीत माणुसकी जपत प्रत्येकामध्ये ईश्वराचे रुप पहात वारी केल्यामुळे वारकऱ्यांना एकमेकांमध्ये माऊलीचे दर्शन घडत असल्याचे सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सुचनेप्रमाणे महाविद्यालय वारीत सहभागी होऊन वारकरी यांची सेवा करीत महाविद्यालयीन प्राध्यापक व विद्यार्थी यांनी वारकऱ्यांना बिस्किट पुडे वाटप करून वारी सेवेचा आनंद घेतला असल्याचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर यांनी सांगितले. यावेळी उपप्राचार्य डॉ अरुण कांबळे, प्रा. डॉ. रामचंद्र पाखरे ,प्रा. ज्योत्स्ना गायकवाड,प्रा.राजेंद्रकुमार डांगे ,प्रा डॉ. सुहास भैरट ,प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, ग्रंथपाल विनायक शिंदे इ प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.