... शासकीय तांत्रिक विद्यालयात 11 वी च्या द्विलक्षी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरु
घोले रोड शासकीय तांत्रिक विद्यालयात 11 वी च्या द्विलक्षी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरु
पुणे :- शासकीय तांत्रिक विद्यालय घोलेरोड पुणे येथे इयत्ता 11 वी च्या द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या विषयांना प्रवेश देण्यास सुरु करण्यात आले असल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी कळविले आहे.
याअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय अभ्यासक्रमाकरीता 50 जागा उपलब्ध असून संलग्न महाविद्यालय मॉडर्न हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज आहे. इलेक्ट्रीकल मेन्टेनन्स व्यवसाय अभ्यासक्रमाकरीता 100 जागा उपलब्ध असून संलग्न महाविद्यालय फर्ग्युसन कॉलेज आहे. मेकॅनिकल मेन्टेनन्स अभ्यासक्रमाकरीता 100 जागा उपलब्ध असून संलग्न महाविद्यालय आबासाहेब गरवारे ज्युनिअर कॉलेज आहे. स्कुटर अँड मोटार सायकल सर्व्हिंसिंग अभ्यासक्रमासाठी 50 जागा उपलब्ध असून नूतन मराठी विद्यालय(मुलींचे) पुणे व अभिषेक विद्यालय चिंचवड पुणे संलग्न महाविद्यालये आहेत.
प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी श्री. शेवाळे (मो.नं 9822109175), टेकवडे एम.के. (मो.नं 9822213150), श्री. लोहकरे (मो.नं.9860423737), श्रीमती सांगरुळकर (मो.नं.9922443626) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळवण्यात आले आहे.