CRIME NEWS ! मोटारसायकल चोरी च्या गुन्हयातील दोन आरोपी अटक; दोन मोटासायकल व दोन मोबाईल जप्त
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन ची कारवाई वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील होळ गावचे हददीत निरा बारामती रोडवर नऊ फाटा येथे दि. २१/०६/२०२२ रोजी ००:०१ वा चे सुमारास फिर्यादीचे राहते घराचे समोरून शेडमधे लावलेली मोटार सायकल किंम्मत अंदाजे ३५०००-/रु चोरी झाले बाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. २४८/२०२२ भादवि ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील संशईत आरोपी नामे १) सोमनाथ अशोक कुंभार रा दत्तवाडी पुणे सध्या रा ढाकाळे ता बारामती जि पुणे २) शुभम दशरथ चाळेकर रा गणेश कॉलनी दत्तनगर जांभुळवाडीरोड,कात्रज, पुणे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता यांनी सदर ठिकाणी मोटारसायकल चोरी केले असल्याचे कबुल केले त्यांनी गुन्हा करतेवेळी वापरेलेली मोटारसायकल ही हडपसर येथुन चोरी करून गुन्हयाचे कामी वापरत
असल्याचे कबुल केले आहे, त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याचेंकडे एक कोयता व दोन मोबाईल, बनावट आधारकार्ड असे मिळुन आले आहे, सदरचे मोबाईल हे आरोपी यांनी शिरवळ ता खंडाळा जि सातारा व लोणीकाळभोर ता हवेली येथुन चोरी केले असल्याचे सांगत आहे. दोन्ही मोटारसायकल गुन्हयाचे कामी जप्त
करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक मा. डॉ. अभिनव देशमुख सो पुणे ग्रामीण पोलीस, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते सो. बारामती विभाग बारामती, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे सो बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री
सोमनाथ लांडे, सहा फौज दिपक वारूळे, पोहवा राहुल भाग्यवंत, पोना हृदयनाथ देवकर, पोना रूपेश साळुंखे,पोशि पोपट नाळे, पोशि अमोल भुजबळ, पोशि नितीन साळवे यांनी केली. पुढील अधिक तपास पोहवा राहुल भाग्यवंत हे करीत आहेत.