Type Here to Get Search Results !

CRIME NEWS माजी सैनिकाचा पत्नी व सासूवर गोळीबार.

CRIME NEWS माजी सैनिकाचा पत्नी व सासूवर गोळीबार.

 पत्नी ठार तर सासू गंभीर.


पुणे जिल्हा शिरूर न्यायालयाच्या परिसरात माजी सैनिकाने माय-लेकींवर गोळीबार केला आहे. यामध्ये या माजी सैनिकाच्या पत्नीचा मृत्यू झाला तर सासू गंभीर जखमी झाली . भरदिवसा न्याायलयाच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या माजी सैनिकाला अटक करण्यात आली आहे.

दिपक ढवळे असे या माजी सैनिकाचे नाव आहे. त्यांचा शिरुर न्यायालयात पोटगीसाठी दावा सुरू होता. याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याची पत्नी मंजुळा रंगनाथ झांबरे आणि सासू न्यायालयात आले होते. न्यायालयाच्या परिसरात थांबलेले असताना माजी सैनिक असलेल्या दीपक ढवळे याने स्वतः जवळच्या लायसन्स असलेल्या पिस्तूलमधून पत्नी आणि सासूवर गोळ्या झाडल्या.
यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सासू गंभीर जखमी झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरूर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली. त्यानंतर आरोपी दीपक ढवळे याला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test