Type Here to Get Search Results !

पर्यटनाला चालना देणाऱ्या नवीन कॅरॅव्हॅनचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्याहस्ते उद्घाटन

पर्यटनाला चालना देणाऱ्या नवीन कॅरॅव्हॅनचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्याहस्ते उद्घाटन
पुणे,दि. १८:- पुणे विभागात पर्यटनाला चालना देण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्याहस्ते १८ जून  रोजी "मोटोहोम" या कंपनीच्या नविन कॅरॅव्हॅनचे उद्घाटन करण्यात आले असून या सुविधेचा जास्तीत जास्त पर्यटकांनी लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

विभागात गड किल्ल्यांचे पायथे,धरणांचे बँक वॉटर, अभयारण्य यासारखे विविध पर्यटनस्थळ आहेत. कॅरॅव्हॅनच्या माध्यमातून या ठिकाणाचा आनंद घेण्याबरोबरच राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी विभागीय पर्यटन कार्यालय, आय बॅरक, नवीन मध्यवर्ती इमारत, पुणे-४११००१, संपर्क क्रमांक- ८०८००३५१३४, ई-मेल आयडी-diotpune@gmail.com येथे संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test