सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मु.सा.काकडे महाविद्यालय महाविद्यालयाला नुकतेच सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदर्पण करत असून या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाविद्यालयाने रविवार दि 19 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महाविद्यालयात माजी विद्यार्थी आर. एन. शिंदे सभागृहात स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे.ई. सण 1972 पासून ते इस आजपर्यंत माजी विद्यार्थी या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहणार आहे असून माजी विद्यार्थ्यांची संख्याही खूप असल्याने संपूर्ण महाविद्यालय परिसर गजबजून जाणार असल्याचेही चित्र दिसणार आहे .मु सा काकडे महाविद्यालय स्थापना इसवीसन 1972 पासून चे माजी विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याचे माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष शहाजी काकडे देशमुख यांनी माहिती दिली.
माजी विद्यार्थी संघटना यांनी गेले दोन महिने गुगल फॉर्म च्या द्वारे माजी विद्यार्थ्यांना रजिस्टर करण्याचे आवाहनही केले होते यामध्ये बरेच माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असल्याचे माजी विद्यार्थी संघटना यांनी माहिती दिली. तसेच जास्तीत ज्यास्त माजी विध्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्यास उपस्थित राहण्याचे आव्हानही काकडे यांनी केले.